Pune New Tunnel : पुण्यात तयार होणार 2 नवीन बोगदे; प्रवास होणार सुपरफास्ट

Pune New Tunnel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune New Tunnel । शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीचे बेस्ट ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी हा मुख्य प्रश्न बनला आहे. शहराच्या सर्वच भागांना वाहतूक कोंडीने अक्षरशः ग्रासलं आहे. हि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासन सातत्याने नवनवीन प्रकल्प राबवत असते. आता असाच एक निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या वाहतूक कोंडीला तोंड देण्यासाठी, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शहराच्या प्रमुख भागांना जोडणाऱ्या दोन नवीन बोगद्यांच्या योजनांना गती दिली आहे. तळजाई-पाचगाव आणि सुतारदरा-पंचवटी यादरम्यानच्या बोगद्यांची कामे आता लवकरात लवकर मार्गी लागणार आहेत.

प्रवासाचा वेळ अवघ्या १० मिनिटांवर- Pune New Tunnel

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पांना जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर, पीएमसीने आता तळजाई-पाचगाव आणि सुतारदरा-पंचवटी बोगद्याचे काम सुरू करण्यासाठीच्या हालचाली वाढल्या आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी या बोगद्यासाठी आवश्यक जागेची नुकतीच पाहणी केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की तळजाई-पाचगाव बोगदा सातारा रोड आणि सिंहगड रोडला थेट जोडेल. सध्या या मार्गावरील ९-१० चौकांमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ४० ते ५० मिनिटे लागतात. परंतु एकदा का बोगदा बोगदा पूर्ण झाला कि मग हेच अंतर २.५ किलोमीटरपर्यंत कमी होईल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ अवघ्या १० मिनिटांवर येईल. Pune New Tunnel

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या बोगद्यांमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल… त्यांच्या गाडीतील इंधनाची बचत होईल आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होईल.पीएमसी अधिकाऱ्यांनी यावर भर दिला की जलद बोगदा प्रकल्प शहराच्या दीर्घकालीन शहरी गतिशीलता धोरणाचा भाग आहेत आणि हा प्रकल्प वेळेवर कसा पूर्ण करता येईल याकडे आम्ही बारकाईने लक्ष्य ठेवू . थोडक्यात काय तर या प्रस्तावित बोगद्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांचा प्रवास सुसाट होणार आहे. एका तासाचा प्रवास जवळपास पाच – दहा मिनिटांवर येणार असल्याने प्रवाशांचा अतिशय महत्वाचा असा वेळ वाचणार आहे.