पुण्यात कोरोनाचा कहर !! 2587 नव्या कोरोना रुग्णांची भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून दिवसेंदिवस झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात काही महत्त्वाच्या ठिकाणी कडक निर्बंध घालून देखील कोरोना आटोक्यात येत नसून राज्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या पुणे शहराची स्थिती तर अतिशय गंभीर असल्याचं म्हटंल जात आहे.

बुधवारी दिवसभरात पुण्यात 2587 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण याकडे पाहिले, तर पुण्यात कोरोना महामारीची स्थिती चिंताजनक असल्याचं दिसतं. पुण्यात दररोज अडीच हजारांच्या पुढे नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 1 हजारांपेक्षांही कमी आहे. आज पुण्यात दिवसभरात 2587 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर दिवसभरात फक्त 769 जण कोरोनातून मुक्त झाले.

दरम्यान, राज्यातील करोना संसर्गाचा वेग दिवसेंदिवस पुन्हा एकदा अधिकच झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. अनेक शहारांमध्ये तर लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे.

Leave a Comment