robbery : आरोपीने पुण्यातील पेट्रोल पंपावर कुऱ्हाडीने वार करत टाकला दरोडा, CCTV फुटेज आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । robbery : पुण्यामध्ये काल रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका चोरट्याने पुण्यातील नऱ्हे परिसरातील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा (robbery) टाकून कर्मचाऱ्याला मारहाण करत रोकड लंपास केली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे. यामध्ये दरोडेखोराने केलेल्या हल्ल्यात पेट्रोल पंपावरील कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

काय घडली नेमके ?

‘पुण्यातील नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ हा पेट्रोल पंप आहे. मध्यरात्री फारशी वर्दळ नसल्यानं येथील कर्मचारी केबिनमध्ये आराम करत होते. त्यावेळी रात्री दीडच्या सुमारास दरोडेखोर (robbery) त्या ठिकाणी आले. यामधील एका दरोडेखोरानं त्यांच्याकडं पैशांची मागणी केली. त्याला कर्मचाऱ्यांनी नकार देताच एका दरोडेखोरानं (robbery) त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घातली आणि दुसऱ्याला मारहाण केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्याच्या भीतीनं ड्रॉवरमधील सर्व रक्कम त्या दरोडेखोराला दिली.

यानंतर त्या दरोडेखोराने (robbery) रक्कम स्वत:च्या ताब्यात घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर घाबलेल्या कर्मचाऱ्यांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोरांचा तपास सुरू केला. पोलीस CCTVच्या आधारे या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :

इंग्लंडचा कसोटी संघाचे कर्णधार Ben Stokes म्हणाला,” मी IPL मध्ये तेव्हाच खेळेन जेव्हा…”

Multibagger Stock : ‘या’ पेपर कंपनीच्या शेअर्सने एका वर्षात दिला 160 टक्के नफा !!!

Train Cancelled : रेल्वेकडून आज 145 गाड्या रद्द !!! अशाप्रकारे ट्रेनचे स्टेट्स तपासा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजच्या किंमती तपासा !!!

Motorola Edge 30 Ultra : 200MP कॅमेराचा पहिला मोबाईल भारतात लवकरच लॉंच होणार; काय असेल किंमत