Motorola Edge 30 Ultra : 200MP कॅमेराचा पहिला मोबाईल भारतात लवकरच लॉंच होणार; काय असेल किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात मोबाइलचा (Motorola Edge 30 Ultra) वापर जवळपास सर्वजण करत असतात. सतत नवनवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. त्यातच आता तुम्ही चांगले फोटो येणाऱ्या मोबाईलच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. २०० मेगापिक्सल कॅमेरा असलेला Motorola Edge 30 Ultra लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. काही दिवसांपूर्वी,या मोबाईलचे लॉन्चिंग चीनमध्ये झालं आहे आता हा मोबाईल भारतीय बाजारपेठेत येण्यासाठी सज्ज झाला आहे. चला आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनचे काही खास फीचर्स ..

 6.73 इंच डिस्प्ले-

चीनमध्ये लॉन्च केलेल्या X30 Pro प्रमाणेच Motorola Edge 30 Ultra चे फीचर्स असू शकतात. या मोबाइलला 6.73 इंच फुल एचडी + POLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता असून त्याच रिफ्रेश रेट 144Hz आहे. फोनचे बेझल खूपच स्लिम आहेत, ज्यामुळे त्याचा लूक खूपच प्रिमियम आहे. कंपनीने हा फोन 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज पर्यायामध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट प्रोसेसर आहे.

Motorola Edge 30 Ultra

200MP कॅमेरा- (Motorola Edge 30 Ultra)

या स्मार्टफोनचे (Motorola Edge 30 Ultra)  मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे याचा कॅमेरा, या स्मार्ट फोनमध्ये 200- मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 12-मेगापिक्सेल टेलीफोटो अँगल सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी फोनमध्ये 60-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येऊ शकतो.

Motorola Edge 30 Ultra

 4500mAh बॅटरी-

Motorola च्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी असेल जी 125 W च्या जलद चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीकडून असा दावा करण्यात आला आहे की हे चार्जिंग तंत्रज्ञान अवघ्या 7 मिनिटात 50% पर्यंत बॅटरी चार्ज करते. तसेच मोबाईलला (Motorola Edge 30 Ultra) फुल्ल चार्ज करण्यासाठी फक्त 19 मिनिटे लागतात. चीनमध्ये या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 3699 युआन (सुमारे 43,600 रुपये) आहे. कंपनी याच किमतीच्या आसपास भारतात मोबाईल लॉन्च करू शकते.

हे पण वाचा :

Vivo चा बजेट स्मार्टफोन लॉन्च; किंमत 11 हजारांहून कमी

OnePlus 10T : OnePlusने लॉन्च केला दमदार मोबाइल; फक्त 19 मिनीटांत होणार फुल्ल चार्ज

Asus ROG Phone 6 Pro : 18 GB RAM चा Asus चा दमदार मोबाईल लॉंच; पहा किंमत आणि सर्वकाही

Realme 9i 5G : 5,000 mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा..; Realme चा दमदार मोबाईल लॉन्च

Vivo V25 Pro : 64MP कॅमेरावाला Vivo चा दमदार मोबाईल लाँच; पहा फीचर्स आणि किंमत