पुणे पोलिसाने गायले देशभक्तीपर गीत, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आपण व्हायरल (Viral Video) होताना पाहत असतो. यामध्ये काही व्हिडिओ पोलिसांचेसुद्धा असतात. अशाच एका पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते आपल्या मधुर आवाजात देशभक्तीपर गीत गात आहेत. हा व्हिडिओ लोकांना मोठ्या प्रमाणात आवडत आहे.

हे गाणे पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल सागर घोरपडे यांनी गायले आहे. या गाण्यातून सागर यांची देशभक्ती दिसून येत आहे. सागर यांच्या आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. त्यांच्या या गाण्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुणे शहर पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

या व्हिडिओला सोशल मीडियावर (Viral Video) आतापर्यंत 7 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक लोकांनी यावर कमेंट्सदेखील केल्या आहेत. कॉन्स्टेबल सागर घोरपडे यांनी बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याच्या ‘भुज’ या चित्रपटातील ‘देश मेरे’ हे गाणे गायले आहे. हे ओरिजनल गाणे बॉलीवूड गायक अरजित सिंह याने गायले आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!