हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे ते दौंडवरून (Pune Railway) येण जाण करणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्यामुळे डेमो रेल्वेचा वापर करणारे नागरिकही अधिक आहेत. सहाजिकच गर्दीचे प्रमाण मोठे असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. परंतु आता पुणे ते दौंड प्रवासासाठी तुम्हाला डेमोची वाट बघावी लागणार नाही. कारण आता लवकरच ह्या पुणे ते दौंड प्रवासासाठी नवी लोकल ट्रेन सुरु होणार आहे.
पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपकडून केली मागणी
पुणे ते दौंड संदर्भात लोकल सुरु करण्याची अनेक वर्षांपासूनची असणारी मागणी आता पूर्ण होणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती . यापूर्वी पुणे ते लोणावळा अशी लोकल सुरु करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे, पुणे ते दौंड ह्या मार्गांवर लोकल नसल्यामुळे प्रवाश्यांना डेमोतुनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो. परंतु आता यावरती उपाय म्हणून पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपकडून ह्या मार्गावर लोकल सेवा सुरु करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.
एका महिन्याच्या आत सुरु होईल लोकल- Pune Railway
रेल्वे विभागाच्या (Pune Railway) अधिकाऱ्याने ह्या मागणीवर लक्ष घालत एका महिन्याच्या आत पुणे विभागाला इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (ईएमयू) चे दोन रेक मिळणार आहेत. तसेच ह्या महिन्याच्या अखेर पर्यंत किंवा दोन महिन्यात पुणे दौंड लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. असे रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लोकल रेक आल्यानंतर त्याची चाचणी घेतली जाईल. त्यांनांतर तिचे दोन टप्प्यात रूपांतर करण्यात येईल. म्हणजेच पुणे ते दौंड अशी लोकल रेल्वे सेवा सुरू केली जाईल. मुंबई विभागाकडून पुणे विभागाला सुरूवातीला दोन ईएमयू रेक मिळणार आहेत. त्याची चाचणी केली जाणार आहे. आधी दोन रेक त्यानंतर तीन असं करत लोकल रेक वाढवले जातील अशी माहिती समोर आली आहे.
50 हजार लोकांना होणार ह्याचा फायदा
पुणे ते दौंड असा प्रवास करणारे प्रवासी अधिक असल्यामुळे त्यांच्यासाठी लोकल सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पुणे ग्रामीण ग्रुपकडून लोकलची मागणी करण्यात आली आहे. त्यावर अंमलबजावणी करत रेल्वे अधिकाऱ्यांनी लोकल सेवा अवघ्या 1 महिन्यात सेवेत रुजू केली जाईल असे सांगितले. ही लोकल सेवा सुरु झाल्यानंतर तब्बल 50 हजार प्रवाशांना याचा फायदा होणार असून प्रवास अतिशय चांगला आणि सुखकर होण्यास मदत होणार आहे.
किती असेल वेग
लोकलसाठी दिल्या जाणाऱ्या या रेकचा वेग 110 किमी आहे. यामुळे लोणावळापेक्षा दौंडचा प्रवास वेगवान होणार आहे. पुणे ते दौंड दरम्यान एकूण पाच लोकल धावणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे आता एकूण किती लोकल ह्या मार्गावर धावणार ह्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.