विधान परिषदेची जागा देण्याचा शब्द साहेबांनी बारामती भेटीत दिला होता, पण अजून एक निरोप नाही; राजू शेट्टी अस्वस्थ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे  । विधान परिषदेच्या जागेसंदर्भात माझी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती. विधान परिषदेची एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात येईल, असा शब्द शरद पवार यांनी दिला होता, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. मात्र तीन महिने झाल्यानंतरही राष्ट्रवादीकडून कुठलाही निरोप नसल्याचं राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तीन महिन्यांपूर्वी राजू शेट्टी यांनी बारामतीमध्ये जात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा स्वाभिमानीला देण्याचा शब्द त्यांनी दिला होता, पण आता काय झालं, मला माहिती नाही, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

बारामतीत नेमकं काय घडलं..
महायुतीशी फारकत घेतल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजू शेट्टी आघाडीच्या जवळ गेल्याचं पाहायला मिळालं. १६ जून रोजी राजू शेट्टी यांनी बारामतीमध्ये जात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी शेट्टी आणि पवार यांच्यात अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली. याच बैठकीत राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याचं निश्चित झाल्याचं बोललं जात होतं. पण आता शरद पवार यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील शेट्टी भेट
राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील 4 पैकी एक जागा राजू शेट्टींना देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ठरल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानीला विधानपरिषदेची एक जागा देणार आहे. त्याबाबतच जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाल्याचं सांगण्यात येत होतं.

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी 17 नावं चर्चेत
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये एकनाथ खडसेंसह आदेश बांदेकर, आशिष देशमुख, वरुण सरदेसाई, सत्यजीत तांबे, सचिन सावंत, सचिन अहिर याांच्यासह विविध क्षेत्रातील 17 जणांच्या नावांची चर्चा आहे. जून महिन्यापासून या जागा रिक्त असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या लांबल्या होत्या.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment