Pune Ring Road : पुणे- पिंपरी चिंचवड रिंगरोडचे काम 90 टक्के पुर्ण; नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका

Pune Ring Road
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune Ring Road) शहरातील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून बनवण्यात येत असलेल्या रिंग रोडचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. आता लवकरच रोडच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्या दुकानांना हटवण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. हा रोड पुर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीपासून पुणेकरांची सुटका होणार आहे. या रोडला पुणे शहरापासून नाशिकच्या हायवेपर्यंत जोडण्यात येणार आहे. यामुळे या दोन शहरातील अंतर देखील कमी होईल.

एमएसआरडीसीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या रिंगरोड पश्चिम भागात पाच टप्प्यांत तर पूर्व भागाचा चार टप्प्यांत विकसित केला जाणार आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडची वाढती वाहणूक कोंडी पाहता त्यावर पर्याय म्हणून हा रिंगरोड बांधण्यात येत आहे. या रिंगरोडला शहराशी जोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नाशिक हायवेपासून रिंगरोड वाघोलीपर्यंत जोडण्याचा प्रस्ताव मांडला होता. १९९७ मध्ये बुद्रुक गावाला पिंपरी चिंचवड मनपामध्ये सहभागी करण्यात आले. त्यानंतर या रोडला चौ. ९० मीटर ठेवण्यात आले. परंतु २५ वर्षे उलटून गेल्यानंतर देखील याचे काम पूर्ण करण्यात आले नाही. गेल्या पाच वर्षांत पुन्हा रस्त्याचे काम सुरु करण्यात आले.

१५ हजार कोटी खर्च – (Pune Ring Road)

आता या रस्त्याचे काम ९० टक्के पुर्ण झाले आहे. तीन ठिकाणी काही कारणांच्या अडचणींमुळे रस्त्याचे काम थांबवण्यात आले होते. सद्य स्थितीत रिंगरोडच्या कामाने वेग धरला आहे. हा रिंग रोड एकून १३६.८० किलोमीटर लांबीचा असणार आहे. तसेच यासाठी १५ हजार कोटी खर्च करण्यात येत आहे. दरम्यान रिंग रोडच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानांना हटवल्यानंतर रोडचे काम पालिकेकडून सुरु करण्यात येणार आहे. या दुकांनाचे स्थलांतर ऑक्टोबर महिण्यात सुरु करण्यात येणार आहे. या रोडमुळे वाहतूक कोंडीवर नियंत्रण बसेल. तसेच प्रवासातील वेळ देखील कमी होईल.