उदयनराजेंच्या प्रयत्नांमुळेच रेल्वेची पुणे-सातारा शटल सुरु होणार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातत्याने केलेल्या सूचना तसेच प्रयत्नांमुळेच सातारा जिल्ह्यातील पुणे सातारा शटल सुरु होणार आहे. त्यांनी सातत्याने रेल्वे क्रॉसिंगवर ब्रिटिशांपासून असलेली फाटक पद्धत बंद करून तेथे स्वयंचलित फाटके व नवीन पुलांची उभारणी करावी, यासह रेल्वेसंबंधीचे अनेक प्रश्न व त्यावरच्या उपाययोजना त्यांनी नमूद केल्या आहेत. तसेच जिल्हा पातळीवर पुणे विभागाच्या अधिकारी व प्रतिनिधी यांची १५ दिवसांतून एकदा बैठक बोलावून रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी गतिमान प्रशासन पद्धत अवलंबावी, अशा सूचनादेखील  केल्या आहेत. रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापिका रेणू शर्मा यांनी म्हंटले आहे.

उद्यान राजे यांच्या प्रयत्नांमुळेच आता जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रश्नांसंदर्भात कारवाई केली जाणार आहे. लवकरच शटल सेवादेखील सुरु केल्या जातील अशी माहिती समोर आली आहे. रेल्वेच्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांबाबत आज पुणे येथे महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी रेणू शर्मा यांनी उदयन राजे यांनी सतत पाठपुरावा केला असल्याचे सांगितले. उदयन राजे यांनीदेखील या बैठकीला उपस्थिती लावली होती.

बैठकीत उदयन राजेंनी रेल्वेसंदर्भातील विविध समस्या मांडल्या. ‘रेल्वे लाईनचे दुहेरीकरण करण्यासाठी संपादित होणाऱ्या जमीन मालकांच्या समस्या जाणून घेऊन संपादनाची कार्यवाही पूर्ण करावी. भूसंपदनासाठी मंजूर केलेल्या ३३ कोटी रुपयांपैकी केवळ एक कोटीचे वाटप झाले आहे. उर्वरित तातडीने करावे’ असे उदयन राजे यावेळी म्हणाले. सातारा ते पुणे शटल सेवा सुरु करण्यासाठी पुणे विभाग सकारात्मक असल्याचे रेणू शर्मा यांनी सांगितले.

Leave a Comment