Pune Scam : भूअंकुर ऍग्रो कंपनीने गुंतवणुकीच्या नावाखाली घातला 200 कोटींचा गंडा; पुण्यातील घटनेनं खळबळ

Pune Scam Bhuankur Agro Company scam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Scam । भूअंकुर ऍग्रो प्राईड कंपनीने गुंतवणुकीच्या नावाखाली 200 कोटींचा घोटाळा केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवा, तुम्ही जितकी जास्त रक्कम गुंतवाल तितके जास्त रिटर्न तुम्हाला देऊ असं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून रवी कानडजी, अरविंद चौधरी,अनुराधा आणि प्रियंका अशी आरोपींची नावे आहेत.

नेमकं काय घडलं? Pune Scam

पुण्यातील या स्कॅमबाबत (Pune Scam) फसवणूक झालेल्या बेबी असमा अजमद असमा (वय ३५) यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्या इन्डस्ट्री कंपनीत मजुरी म्हणुन काम करतात. नवऱ्याचे निधन झाल्याने त्या त्यांच्या २ मुलांसोबत राहतात. नागराज नावाच्या व्यक्तीने फिर्यादीला पुण्यातील प्रॉफिट ट्रेड नावाच्या कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले. ती कंपनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असून जेवढे जास्त पैसे तुम्ही गुंतवाल तेवढा मोबदला तुम्हाला आम्ही देऊ असं अमिश दाखवण्यात आलं. यानंतर २०२३ मध्ये अनिल व्यवहारे हा प्रोफिट ट्रेड कंपनीचा माणुस हा पुण्यातून थेट फिर्यादीच्या राहत्या घरी गेला. आमची कंपनी नवीन आहे. त्यात तुम्ही पैसे गुंतवल्यास आम्ही तुम्हाला प्रत्येक महीन्याला ५ टक्के परतावा देऊ असं आश्वासन त्याने दिले.

त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन फिर्यादीने १४/११/२०२३ रोजी ३,००,००० रुपये सी. बी. एस. बॅक मार्फत मी ०५९७०४४८९०६९१९५००१ या प्रोफिट ट्रेड असोसियटड या कंपनीच्या अकाऊट नंबरवर पाठविले. १८-१२-२३ रोजी सी. एस. बी बँक शाखा ,मेरी कॉलेज रोड, थ्रीशूल येथून सीबीएस बँक मार्फत ०५९७०४४८९०६९१९५००१ या प्रोफिट ट्रेड असोसियटड या कंपनीच्या अकाऊटला पैसे भरले. त्यानतर फिर्यादीने प्रोपीट ट्रेड असोसियटस कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन रविद्र कानडजे यांच्याकडे आणखी ३ लाख रुपये दिले. यानंतर रविद्र कानडजे यास पैसे व त्याबदल्ल्यात देण्यात येणारा मोबदला याबाबत विचाले असता त्याने २१/०१/२०२५ रोजी भुअंकुर ॲग्रो प्राईड प्रायवेट लिमीटेड कंपनीचे खाते क्रमाक २३०२२३५४४८६५१२६६ चा ५,००,००० रुपयेचा चेक दिला आणि २१/०२/२०२५ रोजीचा भुअंकुर ॲग्रो प्राईड प्रायवेट लिमीटेड कंपनीचे खाते क्रमाक २३०२२३५४४८६५१२६६ चा तीन लाख रुपयेचा चेक दिला त्याने दिलेले दोन्ही चेक बाऊन्स झाले.

त्यानतर फिर्यादीने थेट कंपनीच्या पुण्यातील (Pune Scam) ऑफिसवर धाड टाकली, आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी विचारपूस केली असताना सदर फसवणूक करणारी टोळी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आलं. प्रॉफिट ट्रेड कंपनीने चे रविद्र कानडजे,अनिल व्यवहारे, अमोल नरवडे जयप्रकाश, अनुराधा अतुल नायक अय्याप्पा कुमार गंगारत्नमा यांनी सर्वानी मिळुन तंबाबा ८ लाख रुपयांना गंडा घातला. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.