Pune Sindhudurg Flight : बाप्पा पावला!! पुण्यातून कोकणात ज्यादा विमाने; प्रवाशांना दिलासा

Pune Sindhudurg Flight
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Sindhudurg Flight । गणेशोत्सवानिमित्त मुंबई- पुण्याहून कोकणात जाणाऱ्या भक्तांची संख्या जास्त असते. कोकणातील चाकरमानी गणपतीला गावी जातो म्हणजे जातोच. अशा चाकरमान्यांसाठी रेल्वे आणि एसटी विभागाने अनेक ज्यादा बसेस सोडल्या आहेत. आता यामध्ये विमान कंपन्याही मागे नाहीत. गणेशभक्तांचा प्रवास आणखी सोप्पा व्हावा, त्यांना लवकरात लवकर कोकणात पोहचता यावे यासाठी प्रादेशिक विमान कंपनी FLY91 ने पुणे-सिंधुदुर्ग-पुणे मार्गावर अतिरिक्त उड्डाणे जाहीर केली आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना पुन्हा एकदा बाप्पा पावला असं म्हणावं लागेल.

कोणकोणत्या दिवशी ज्यादा उड्डाणे- Pune Sindhudurg Flight

पुण्यात नोकरीनिमित्त आलेल्या कोकणवासीयांची संख्या जास्त आहे. अशा प्रवाशाना हि विमानसेवा मोठा दिलासादायक ठरेल. कोकणात रस्ते मार्गाने जायचं म्हंटल तर रस्त्यात खड्डे आहेत कि खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही. रेल्वेची तिकीटही बऱ्यापैकी बुक झाली आहेत. त्यामुळे FLY91 चा विमानप्रवास प्रवाशांना कमी वेळेत कोकणात घेऊन जाईल. फ्लाय 91 कंपनीकडून पुण्यातून सिंधुदुर्गला गणेशोत्सवात पाच दिवस जादा विमानेसवा (Pune Sindhudurg Flight) चालवण्यात येणार आहेत. त्यानुसार, 24 ऑगस्ट, 29 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 5 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबरसाठी अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. या उड्डाणांसाठी तिकिटे एअरलाइनच्या वेबसाइटवर बुकिंगसाठी उपलब्ध आहेत

याबाबत FLY91 चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी म्हंटल कि, “गणेश चतुर्थी हा आमच्या ग्राहकांसाठी एक खास काळ आहे, ज्यामध्ये बरेच लोक कुटुंब आणि मित्रांसोबत प्रवास करतात. आमच्या पुणे-सिंधुदुर्ग-पुणे मार्गावर अतिरिक्त उड्डाणे जोडून, या उत्सवाच्या काळात प्रवाशांना अधिक पर्याय देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ही ठिकाणे आमच्या प्रादेशिक नेटवर्कसाठी महत्त्वाची आहेत आणि आम्ही शेवटच्या मैलापर्यंत आरामदायी आणि विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी देण्यासाठी वचनबद्ध आहोत. (Pune Sindhudurg Flight)

दरम्यान, FLY91 यापूर्वीही १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अतिरिक्त उड्डाणे सुरु केली होती. कंपनीने 14, 15 आणि 18 ऑगस्ट रोजी पुणे-गोवा-पुणे आणि पुणे-सिंधुदुर्ग-पुणे क्षेत्रांमध्ये सेवा सुरू केल्या. गर्दीच्या सीजन मध्ये प्रवाशांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि दुसरीकडे विमान कंपनीचा फायदाही व्हावा अशा दोन्ही उद्देशाने FLY91 काम करत आहे.