हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही महिन्यापासून पुण्यातील वातावरण आणि एकूण सामाजिक परिस्थिती चांगलीच बिघडली आहे. ड्रग रॅकेट, पोर्शे कार अपघात, आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार या एकूण सर्व घटनानी शिक्षणाचे माहेरघर समजणारे पुणे चांगलेच हादरलं आहे. त्यात आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. एका 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवल्याने (Pune Tanker Accident) खळबळ उडाली आहे. सकाळी साडे सहाच्या सुमारास हि घटना समोर आली. त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? पालकांचे आपल्या मुलांवर लक्ष्य नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सकाळी साडे सहाच्या सुमारास वानवडी येथे भरधाव टँकरनं सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली. आश्चर्याची बाब म्हणजे अवघ्या 14 वर्षांचा मुलगा टँकर चालवीत होता. अतशिय अवजड टँकर अवघ्या 15वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून अल्पवयीन चालकाला पकडून ठेवलं होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी हे दुचाकीवरून जात होते. तर त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या काही मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले. या अपघातानंतर टँकर चालक पळून जावू नये म्हणून नागरिकांनी अल्पवयीन मुलाला पकडून ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असूनअधिक तपास सुरू आहे. पोलीस टँकरचा मूळ मालक, महिंद्रा बोराटे याला देखील चौकशीसाठी बोलावणार आहेत.