Pune To Mumbai New Expressway | मुंबई ते पुणे प्रवास करता येणार अवघ्या 90 मिनिटात; तयार होणार नवीन एक्सप्रेस वे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune To Mumbai New Expressway | जे लोक मुंबई ते पुणे दरम्यान रोज प्रवास करतात. त्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भविष्यात जाऊन या दोन्ही शहरात दरम्यानचा प्रवास आणखी सोपा आणि सुलभ होणार आहे. कारण आता मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त दीड तासाच्या अंतरावर करता येणार आहे. याबाबतची घोषणा स्वतः केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणे हा प्रवास करणे इथून पुढे नागरिकांना अगदी सोयीचे आणि अगदी तासाभराच्या अंतरावर होणार आहे.

जर एखाद्या व्यक्तीला पुण्यावरून मुंबईला जायचे असेल, किंवा मुंबईवरून पुण्याला तरी यायचे म्हटले, तरी दोन-तीन तास सहज जातात ट्राफिकमध्ये तसेच इतर सगळ्या गोष्टींमध्ये जास्त वेळ जातो. आणि कधी कधी हा प्रवास चार-पाच तासांवरही जातो. परंतु इथून पुढे ही समस्या अजिबात राहणार नाही. कारण या एक्सप्रेस वेचे काम लवकरच सुरू होणार आहे. नितीन गडकरींनी याबाबत माहिती दिलेली आहे. तसेच मुंबई ते बेंगलोर दरम्यान देखील एक नवीन मार्ग तयार होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. या नवीन एक्सप्रेस वे प्रोजेक्ट अंतर्गत मुंबई येथील अटल सेतूच्या पुढे मुंबई ते पुणे या द्रुतगति महामार्गाला समांतर असा नवीन मार्ग बांधला जाणार आहे.

हा मार्ग पुणे, सातारा, सांगली, बेळगाव आणि बंगलोर पर्यंत जाणार आहे. या महामार्गांपैकी 307 किलोमीटरचा अंतर हे आपल्या राज्यातील असणार आहे. तर उरलेले 493 किलोमीटरचा अंतर हे कर्नाटक राज्यातील असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर तुम्हाला मुंबईवरून पुण्याला यायला केवळ दीड तास लागणार आहे. आणि इथून पुढे पाच तासांमध्ये तुम्हाला बेंगलुरु गाठता येणार आहे. अशी माहिती देण्यात आलेली आहे. आणि या प्रकल्पासाठी तब्बल 60 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिलेली आहे. गडकरी यांनी सांगितलेल्या नुसार या महामार्गाचे दहा हजार कोटी रुपयांचे पहिले काम महिन्याभरात सुरू होणार आहे. आणि उर्वरित पन्नास हजार कोटी रुपयांचे काम हे सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. म्हणजेच येथे वर्षभरात आपल्याला हा नवीन महामार्ग पाहायला मिळणार आहे.

मुंबई, बेंगलोर, पुणे या शहरांचा प्रवासा अतिशय वेगवान व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेल्या आहे. ही तिन्ही शहरे वाहतुकीच्या दृष्टीने तसेच आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची शहरे आहेत. या शहरा दरम्यान अधिक नागरिक दररोज प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांचा हा प्रवास सुलभ करण्यासाठी आता एक नवीन महामार्ग तयार होणार आहे. मुंबई ते पुणे हा प्रवास केवळ 90 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. असा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे. आणि येत्या महिन्याभरातच या महामार्गाचे काम देखील चालू होणार आहे.