Pune To Nagpur : पुणे ते नागपूर अवघ्या 5 तासांत; गडकरींनी सांगितला मास्टरप्लॅन

Pune To Nagpur
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन Pune To Nagpur । महाराष्ट्रातील वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा करत आगामी रस्ते प्रकल्पांची माहिती दिली. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (CPA) च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर नागपुरातील विधान भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी नागपूर आणि विदर्भ विभागासाठी अनेक मोठ्या पायाभूत सुविधांच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी पुणे ते नागपूर महामार्गाचा प्लॅन सांगितला. पुणे ते नागपूर प्रवासासाठी सध्या १० तासांचा वेळ लागतो, अंतर येत्या काळात हेच अंतर अवघ्या ५ तासांत पूर्ण करता येणार असल्याची माहिती गडकरींनी दिली.

काय म्हणाले नितीन गडकरी ? Pune To Nagpur

विदर्भ आणि पश्चिम व मध्य महाराष्ट्र यांच्यातील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी, केंद्र सरकारने १६,३१८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा पुणे-छत्रपती संभाजीनगर नवीन द्रुतगती महामार्गाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी सामंजस्य करार (MoU) आधीच करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर विभागाचा समावेश आहे, तो २,००० कोटी रुपये खर्चून हाती घेतला जाईल. या प्रकल्पात उड्डाणपूल व सहाय्यक पायाभूत सुविधांचा समावेश असेल. यानंतर अहिल्यानगरजवळील शिक्रापूरपासून बीडमार्गे संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गाला जोडणारा एक स्वतंत्र मार्ग प्रस्तावित आहे. या पट्ट्यासाठी टोल-संबंधित निर्णय अद्याप प्रलंबित असले तरी, भूसंपादन आणि संबंधित प्रक्रिया पुढील दोन ते तीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. “हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, पुणे आणि संभाजीनगर दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे दोन तासांपर्यंत कमी होईल, तर संभाजीनगर-नागपूर प्रवासाला सुमारे २.५ तास लागतील, म्हणजेच काय तर पुणे-नागपूर दरम्यानचा (Pune To Nagpur) प्रवास अवघ्या ५ तासांत करणे शक्य होणार आहे.

दरम्यान, पुणे महानगर प्रदेशात, अनेक उन्नत कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर कॉरिडॉरमध्ये तीन-स्तरीय रचना असेल, ज्यात जमिनीवरील रस्ता, दोन उड्डाणपूल आणि नियोजित ठिकाणी सर्वात वर मेट्रो लाईन असेल, हे सर्व एकाच खांबावर आधारित असेल अशी माहितीही नितीन गडकरी यांनी दिली.