प्रवाशांसाठी खुशखबर!! पुणे ते सुरत विमान सेवा होणार लवकरच सुरू; कशी असेल वेळ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे ते सुरत (Pune To Surat) हा प्रवास आता आरामदायी आणि जलद होणार आहे. कारण आठवड्यातील तीन दिवस पुणे ते सुरत अशी विमानसेवा (Airlines) सुरू होणार आहे. येत्या 31 मार्च 2024 पासून ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे प्रवाशांना खूप कमी वेळामध्ये पुणे ते सुरत असा प्रवास करता येईल. या विमानाच्या प्रस्थान प्रवासाला एकूण एक तास लागेल तर परतीच्या प्रवासाला 55 मिनिटे लागतील. यापूर्वी विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना एक तासापेक्षा जास्त प्रवास सुरतला जाण्यासाठी करावा लागत होता. परंतु इंडिगो एअरलाइन्सने पुणे विमानतळापर्यंत आपली कनेक्टिव्हिटी विस्तारल्यामुळे हा प्रवास वेळ कमी झाला आहे.

विमान प्रवासाची वेळ कशी असेल?

पुणे ते सुरत – प्रस्थान वेळ – 12:55 वाजता आगमन – 14:00 वाजता

परतीचा प्रवास – प्रस्थान – 12:55 वाजता, आगमन – 14:00 वाजता

आठवड्यातील 3 दिवस मंगळवार, गुरुवार आणि रविवारी विमानसेवा सुरू असेल.

पुणे ते सुरत विमान प्रवास सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. यामुळे दोन्ही शहरांमधील आर्थिक संबंधांना देखील चालना मिळणार आहे. मुख्य म्हणजे पुणे ते सुरत विमान सेवा सुरू झाल्यामुळे याचा सर्वाधिक आनंद प्रवाशांना झाला आहे. दरम्यान, येत्या दहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन होणार आहे. यानंतर चार ते सहा आठवडे सुरक्षा चाचण्या झाल्यानंतर या नव्या टर्मिनलवरून उड्डाण सेवा सुरू होईल.

विशेष म्हणजे, 10 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनऊ या विमानतळांवरील नवीन टर्मिनल आणि अलिगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद यासह श्रावस्ती विमानतळाचे देखील उद्घाटन करणार आहेत. याबरोबर, वाराणसी, कडप्पा, हुबळी आणि बेळगाव येथील विमानतळाच्या नवीन टर्मिनल चे भूमिपूजन करण्यात येईल. यासाठी सरकारकडून 12 हजार 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.