मागच्या काही दिवसांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलथा पालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रॉपर्टीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये घर घ्यायचं म्हटलं की घरांची किंमत ही कोटींच्या दारात जाऊन पोहोचली आहे. अशातच पुण्यासाठी एक दिलासादायक अहवाल आता समोर आला आहे. सीआरइ मॅट्रिक्स आणि क्रेडाई पुणे यांच्या माध्यमातून पुणे हाउसिंग रिपोर्ट सप्टेंबर 2024 आला असून यामध्ये पुणे शहर हे संपूर्ण देशामध्ये परवडणाऱ्या घरांच्या विक्रीमध्ये प्रथम क्रमांकाचे शहर ठरले आहे चला जाणून घेऊया या अहवालाबद्दल अधिक माहिती
मागच्या सहा महिन्यातली आकडेवारी पुणे हाउसिंग रिपोर्ट सप्टेंबर 2024 मध्ये समोर आली असून पुण्यात विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत ही 71 लाख रुपये इतकी ठरली आहे. तुम्हाला ही रक्कम जास्त वाटत असली तरी देशातल्या मोठमोठ्या शहरांच्या यादीतील परवडणाऱ्या घरांच्या किमतीमध्ये ही किंमत सर्वात कमी आहे. म्हणजेच पुणे हे परवडणाऱ्या घरांच्या यादीमध्ये देशात अव्वल ठरले आहे.
वार्षिक 16 टक्के वाढ
अहवालात दिलेल्या माहितीनुसार यावर्षीच्या पहिल्या सहामाही मध्ये पुण्यात 31 हजार कोटी रुपये मूल्याची चाळीस हजार घरांची विक्री झाली आहे यानुसार एकूण घरांच्या विक्री मूल्यांमध्ये वार्षिक 16 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. एवढेच नाही तर ग्राहकांनी मोठ्या आकाराचे घर घेण्याला अधिक पसंती दिल्याचे देखील या अहवालातून समोर आले आहे. पुण्यामध्ये 2019 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा पहिल्या सामाईक घरांची विक्री हे 36 टक्क्यांनी वाढली आहे. या अहवालानुसार इतर शहरांच्या तुलनेत पुणे आज देखील परवडणारे शहर आहे.
पुण्यातील या भागात सर्वाधिक घरांची विक्री
- अहवालानुसार महाळुंगे, पाषाण, हिंजवडी, बाणेर, ताथवडे आणि वाकड यामध्ये पुण्यातील एकूण घरांच्या विक्रीच्या 60 टक्के घरांची विक्री झाली आहे.
- कोथरूड बावधन वारजे आणि आंबेगाव या भागांमध्ये 2020 च्या तुलनेनुसार बघितलं तर 2024 च्या पहिल्या सामायिक घरांच्या किमतीमध्ये तब्बल 44 टक्के वाढ झाली आहे.
- शहरातील रोजगाराच्या स्थितीमध्ये मागच्या पाच वर्षांपासून आठ टक्के वाढ झाली असल्यामुळे घरासोबतच ऑफिसेस साठी आवश्यक असलेलया जागा आणि वेअर हाऊस इत्यादींच्या मागणीमध्ये देखील वाढ झाली असून पुढेही भाव वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.