Pune Traffic | गणेशोत्सव अगदी दोन दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या गणेशोत्सवाच्या तयारीची धामधूम चालू झालेली दिसत आहे. या दिवसांमध्ये रस्त्यावर खूप गर्दी देखील असते. गणपतीची तयारी करण्यासाठी सगळेजण शॉपिंग करत असतात. त्याचप्रमाणे अनेक लोक हे शहरातून त्यांच्या गावी जात असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये रस्त्यावर खूप जास्त गर्दी दिसते. अशातच आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील तीन दिवस वाहतूक बदल करण्यात आलेला आहे. यासाठी वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा देखील वापर करावा. असे वाहतूक शाखेचे पोलीस अमोल झेंडे यांनी सांगितलेले आहे.
पुण्यामध्ये (Pune Traffic) सध्या गणेश मूर्तीच्या विक्री त्याचप्रमाणे डेकोरेशनची विक्री यासाठी विविध ठिकाणी मोठमोठे स्टॉल लागलेले दिसत आहेत. हे स्टॉल मोठ्या संख्येने डेंगळे पूल ते शिवाजी पूल तसेच अण्णाभाऊ साठे चौक आणि कसबा पेठ पोलीस चौकी जिजामाता चौक यांसारख्या भागांमध्ये आहेत. त्यामुळे या भागांमध्ये सतत वर्दळ पाहायला मिळते. या ठिकाणी अगदी लोकांना चालायला ही जागा मिळत नाही. वाहतुकीची तर जास्त कोंडी होते. त्यामुळे या भागातील वाहतुकीत आता बदल करण्यात आलेला आहे. 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत हा वाहतूक बदल असणार.
त्याचप्रमाणे पुण्यामध्ये (Pune Traffic) सावरकर पुतळा ते सिंहगड रोड पर्यंत अनेक मूर्तीविक्रेतांनी दुकाने मांडलेली आहेत. या भागात वाहन चालकांनी वाहने लावू नये. तसेच मुंडव्यामधील भागात मूर्ति खरेदीसाठी देखील गर्दी होत असते. त्यामुळे या भागातील वाहतुकीत देखील बदल करण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे शिवाजी रोड गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक पर्यंत वाहतूक बंद असणार आहे
यावेळी लोकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. यासाठी तुम्ही गाडगीळ पुतळ्याच्या चौकातून डावीकडे वळून कुंभार वसे चौक शाहीर अमर शेख चौके मार्गे जाऊ शकता. यासोबत तुम्ही शिवाजीनगर मधून स्वारगेटकडे जायचे असले तर सर्व बर्वे चौकातून जंगली महाराज रोड खंडोजी बाबा चौक टिळक रस्त्याने जाऊ शकता. त्याचप्रमाणे झाशी राणी चौक ते खुडे चौक डेंगळे पूल मार्गे कुंभारकडे जाणाऱ्या वाहन तालुक्यांसाठी खुडे चौकातून मंगला चित्रपट गल्लीतून प्रीमियम चौक शिवाजी पूल मार्गे जाऊ शकता.
वाहतुकीस कोणते रस्ते चालू असणार | Pune Traffic
फडके हौद चौक ते जिजामाता चौक, आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक, मंगला चित्रपटगृहासमोरील प्रीमियम गॅरेज गल्ली ते कुंभारवेसमंगला चित्रपटगृहासमोरील प्रीमियम गॅरेज गल्ली ते कुंभार वेस
पीएमपी मार्गात बदल
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता जाणाऱ्या मार्गाने बदल करण्यात आलेला आहे. शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गात आता बदल केलेला आहे. बर्वे चौक जंगली महाराज रस्ता टिळक रस्त्याद्वारे या बस जाणार आहेत. महानगरपालिकेकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस देखील जंगली महाराज रस्त्याने जाणार आहेत.