हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Vande Bharat Express । शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीचे उत्तम ठिकाण म्हणून पुणे शहराला ओळखलं जाते. पुण्यात शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्त देशाच्या विविध ठिकाणावरून लोक येत असतात. साहजिकच पुणे हे वाहतुकीचे सेन्टर ठरत आहेत. पुण्याला येण्यासाठी एसटी बस, ट्रॅव्हल्स, रेल्वे आणि विमानाची सुविधा आहे. पुण्याला २ वंदे भारत ट्रेनही जोडण्यात आलेल्या आहेत. आता पुण्याला आणखी ४ वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत. त्यामुळे पुण्याची कनेक्टिव्हिटी वाढण्यास नक्कीच मदत होईल.
कोणकोणत्या वंदे भारत ट्रेन पुण्याला जोडणार – Pune Vande Bharat Express
१) पुणे-शेगाव वंदे भारत- दौंड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे थांबे समाविष्ट आहेत.
२) पुणे-वडोदरा वंदे भारत: हि वंदे भारत एक्सप्रेस लोणावळा, पनवेल, वापी आणि सुरत या स्थानकांवर थांबेल. या नव्या वंदे भारत ट्रेनमुळे पुणे- वडोदरा प्रवासाचा वेळ ९ तासांवरून ६-७ तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. (Pune Vande Bharat Express)
३) पुणे-सिकंदराबाद वंदे भारत: हि वंदे भारत ट्रेन दौंड, सोलापूर आणि गुलबर्गा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ २-३ तासांनी वाचेल.
४) पुणे-बेळगाव वंदे भारत: हि वंदे भारत एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्रातून प्रवास करेल. सातारा, सांगली आणि मिरज रेल्वे स्थानकावर या ट्रेनला थांबा मिळण्याची शक्यता आहे.या एक्सप्रेसमुळं प्रवासाचा वेळ दोन-तीन तासांनी कमी होऊ शकते. या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटांची किंमत १,५०० ते २,००० रुपयांपर्यंत असण्याची अपेक्षा आहे.
सध्या पुणे शहरातुन २ वंदे भारत ट्रेन धावतात. आता आणखी ४ वंदे भारत एक्सप्रेस पुण्यातून धावणार असल्याने पुणेकरांचा प्रवास सोप्पा होण्यास मदत होईल. लांबच्या पल्ल्यावरून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल. दरम्यान, रेल्वे पुणे – नागपूर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल. प्रवाशांसाठी प्रवास सुलभ करणे, जोडलेल्या प्रदेशांमध्ये पर्यटनाला चालना देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.




