Pune Viral Video : मागच्या काही दिवसांपासून पुण्यात आलेल्या पावसामुळे आणि पुराममुळे पुण्याचं नाव चर्चेत आलं होतं. मात्र आता पुण्याची आणखी एका व्हिडिओमुळे चर्चा होत आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या गाड्यांबद्दल आम्ही आजिबात बोलत नाही आहोत… तर इथे चर्चा आहे चालकाशिवाय धावणाऱ्या गाडीची…रात्रीच्या वेळेस पुणे महानगरपालिकेची गाडी अचानक भर रस्त्यात विनचालक रिव्हर्स धावू लागते…. याच गाडीचा व्हिडीओ (Pune Viral Video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय चला पाहुयात …
नक्की काय आहे व्हिडीओ ? (Pune Viral Video)
या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकाल पुणे महापालिकेची एक गाडी जी विना चालक रस्त्यावरून उलटी धावत आहे. या गाडीला बरेच स्पीड देखील आहे. शिवाय बाजूच्या रस्त्यावरून जाणारी वाहतूकही या व्हिडीओ (Pune Viral Video) मध्ये दिसत आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी ही गाडी डिव्हायडर ला धडकते आणि तिरकी होऊन रस्त्यावर थांबते असा हा व्हिडीओ आहे.
खरेतर अचानकपणे उलट्या दिशेने येणाऱ्या या वाहनाला पाहून मागच्या वाहनांना धडकीच भरली असती. मात्र सुदैवाने यावेळी मागे कुणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. व्हिडिओमध्ये (Pune Viral Video) उलट्या दिशेने जाणारा हा टेम्पो पुणे महानगरपालिकेचे रोड मेंटेनन्स वाहन असल्याचं दिसत आहे.ही घटना रविवारी, 4 ऑगस्ट रोजी पुण्यातील हडपसर येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथील वैदूवाडी उड्डाणपुलावर रविवारी रात्री हा प्रकार समोर आला. कदाचित उतरती असल्यामुळे हा टेम्पो रिव्हर्स आला असावा असे बोलले जात आहे.