पुण्यात बेसमेंटची जाळी कोसळून पाच कामगारांचा जागीच मृत्यू; पाच जण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात गुरुवारी रात्री एक दुर्घटना घडली. येरवडा येथील वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या तळमजल्याचे काम सुरु असताना त्याच्या स्लॅबची जाळी कोसळली. या घटनेत पाच कामागारांचा मृत्यू असून पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते. याच दरम्यान स्लॅबसाठी लोखंडाच्या सळ्यांची तयार केलेली जाळी कोसळून त्याखाली १० कामगार अडकले. यापैकी पाच जणांना बाहेर काढण्यात आले. तर पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

पुण्याचे महापौर मुलीधर मोहोळ यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. “येरवडा येथील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगल्याजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅबची जाळी कोसळून काही लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून आपल्या पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे,” असे महापौर यांनी ट्विटमध्ये सांगितले.

Leave a Comment