प्रतिनिधी पुणे | राज्यात दुष्काळ असताना पुण्यात मात्र शेतकऱ्यांसाठी नानाविध उपक्रम तरुण राबवित आहेत. पुण्यातील कात्रज भागातील अष्टविनायक मंडळाने स्थानिक पातळी वर आणि सामाजिक क्षेत्रातील मान्य वराना हा उपक्रम सांगितला साहजिकच त्यानिही या स्तुत्य उपक्रमास पाठिंबा देऊन आर्थिक योगदान दिल आहे.
आंबेगाव पठार इथे कार्य करत असलेल्या या मंडळाने एक मोठी लायब्ररी तयार करुन पुण्यातील आसपास च्या शेती करणाऱ्या गरजू शेतकऱ्यांना ज्यांच्या कड़े शेतीच्या अवजाराचा तुटवडा आहे त्यांच्या साठी हा राबविला आहे. शेती करण्यासाठी लागनारे अवजारे मोफत दरात देण्याच हा विशेष कार्यक्रम असून याचा फायदा जिल्ह्याच्या अनेक शेतकऱ्यांना होणार आहे अस मंडळाच्या सदस्यानी सांगितल.
राज्यात उद्भवलेल्या दुष्काळसदृश परिस्थितिचा शेतकरी सामना करत असताना पुण्यातील तरुणानी केलेल्या या उपक्रमाचं सर्व क्षेत्रातुन कौतुक होत आहे.या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष – राजेंद्र पवार , उपाध्यक्ष – प्रकाश रेणुसे तसेच मंडळाचे सभासद रोहित वाव्हळ, महेश गवळी, सचिन सोनवणे,सुरज घुगे,वैभव देशमुख,कुणाल निकम,ऋषिकेश पोटरे इत्यादींनी कष्ट घेतले.