Pune Zika Virus : पुणेकरांची चिंता वाढली!! झिका व्हायरस रुग्णांची संख्या 18 वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची आधी सावध करणारी बातमी आहे. धोकादायक अशा झिका व्हायरसचा धोका (Pune Zika Virus) पुण्यात वाढला आहे. पुण्यात आणखी दोन गर्भवतींना झिका व्हायरसचा संसर्ग झाला असून यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या १८ वर पोचली आहे. या दोन्ही महिला खराडी भागातील आहेत. चिंतेची बाब म्हणजे झिकाचा धोका गर्भवतींना अधिक आहे. एकूण १८ मधील १० गर्भवती महिला आहेत.

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे. ज्या भागात झिकाचा रुग्ण (Pune Zika Virus) आढळत आहे त्या भागातील गर्भवतींची वैद्यकीय तपासणी करण्यावर आरोग्य विभाग लक्ष्य घालत आहे. त्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. गुरुवारी झिका व्हायरसची जे २ रुग्ण आढळले त्यामध्ये एक २५ वर्षीय गर्भवती महिला आहे तर दुसरी महिला ३२ वर्षाची आहे. यातील एक महिला २२आठवड्यांची गर्भवती आहे तर दुसरी महिला १८ आठवड्यांची गर्भवती आहे. या दोघींच्याही ॲनोमली स्कॅन अहवाल चांगले आलेले आहेत. या दोघींना कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत

पुण्यात झिकाचे थैमान – Pune Zika Virus

दरम्यान, पुणे शहरात झिका व्हायरसने थैमान घातलं आहे. आत्तापर्यंत झिकाचे एकूण १८ रुग्ण आढळले असून यामध्ये सर्वात जास्त ६ रुग्ण एरंडवणे परिसरातील आहेत. त्यानंतर पाषाण आणि खराडी भागात प्रत्येकी ३, मुंढव्यात २ तर डहाणूकर कॉलनी, उजवी भुसारी कॉलनी, आंबेगाव बुद्रुक आणि कळस परिसरात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. शहरापाठोपाठ पुण्याच्या ग्रामीण भागात सुद्धा झिकाचा शिरकाव झाला आहे. सासवडमध्ये एका ६५ वर्षीय पुरुषाला झिका व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्याला २४ जूनपासून त्रास होऊ लागला. त्यामुळे सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात आणि नंतर पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्तापर्यन्त पुण्यात ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आलाय त्या परिसरात आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. मात्र दिवसेंदिवस झिका व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला असून यामुळे पुणेकरांची चिंता चांगलीच वाढली आहे.