पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाच्यावतीने देशातील पंजाबसह इतरत्र ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पंजाबमध्ये दि. 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र, याला पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी विरोध दर्शवला आहे. हि निवडणूक आयोगाने किमान सहा दिवस पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी आयोगाला पत्र पाठवून केली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार, राज्यातील सर्व 117 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, 16 फेब्रुवारी 2022 रोजी श्री गुरु रविदास यांची जयंती आहे. या दिवशी मोठ्या संख्येने लोक उत्तर प्रदेशातील वाराणसीला जातात. अशा स्थितीत 14 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी मोठ्या संख्येने लोक मतदानापासून वंचित राहू शकतात.

संत रविदास जयंतीनिमित्त 10 ते 16 फेब्रुवारी दरम्यान सुमारे 20 लाख भाविक वाराणसीला जाणार आहेत. दरम्यान निवडणुकीची तारीख पुढे ढकलल्यास संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात आपल्यालाही सहभागी होता येईल आणि मतदानाचा हक्क देखील बजावता येईल. या पार्श्वभूमीवर निवडणूक किमान सहा दिवस पुढे ढकलावी.

पंजाबचे मुख्यमंत्री आणि यांनी निवडणूक पुढे ढकलण्याबाबतची मागणी हि 13 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाला तर पाठवून केली आहे. काँग्रेसनेही आगामी निवडणुकीसाठी शनिवारी 86 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सीएम चरणजीत सिंग चन्नी यांना चमकौर साहिबमधून उमेदवारी दिली आहे, तर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

Leave a Comment