‘या’ राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा करणार लग्न; उद्याच संपन्न होणार विवाह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिंदे – फडणवीसांचे सरकार आले असल्याने एकच चर्चा होत आहे. तर तिकडे पंजाब राज्यातही एक चर्चा होत असून ती राजकारणाची नाही तर एका होणाऱ्या लग्नाची आणि त्या लग्नातील नवरदेवाची होत आहे. ती म्हणजे पंजाब आम आदमी पक्षाचे नेते, हास्य कलाकार आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांची होय. भगवंत मान यांचे पहिले लग्न झाले असून ते आता पुन्हा एकदा लग्नबेडीत अडकणार आहेत. त्यांचे उद्या, गुरुवारी चंदीगढमध्ये त्यांचा डॉ. गुरप्रीत कौर हिच्याशी लग्न होणार आहे. या लग्नसोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणाऱ्या मुख्यमंत्री भगवंत मान यांचा राजकीय प्रवासही चर्चेचा विषय आहे. एक कॉमेडिअन ते राजकीय हस्ती बनलेले भगवंत मान हे 2014 मध्ये पहिल्यांदा संगरूरहून खासदार झाले होते. तेव्हा त्यांची पहिली पत्नी इंदरप्रीत ही त्यांच्या प्रचारामध्ये सक्रीय होती. 48 वर्षीय असलेल्या मान यांचा पहिली पत्नी इंदरप्रीत कौर हिच्याशी घटस्फोट झालेला आहे. या दोघांना दोन मुले आहेत. ही मुले इंदरप्रीत यांच्यासोबत अमेरिकेत राहत आहेत.

पहिल्या पत्नीसोबत 2015 मध्ये घटस्फोट झालयानंतर 2019 मध्ये मान यांनी पुन्हा लोकसभा गाठली. त्यानंतर 2022 मध्ये ते पंजाबचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. 16 मार्चला मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता त्यांचा उद्या दुसऱ्यांदा विवाह होत असून त्याची जय्यत तयारी केली करण्यात आलेली आहे.

Leave a Comment