पंजाबमध्ये १ मे पर्यंत लॉकडाउन; महाराष्ट्रात कधी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । देशभरात सध्या एकाच विषयावर चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लॉकडाउन लांबणार कि संपणार? करोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे काही राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यावर विचार सुरू असतानाच ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पंजाबमध्ये सुद्धा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पंजाब १ मे पर्यंत लॉकडाउनमध्ये राहणार. आज सकाळीच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉकडाउन कायम ठेवण्याचे संकेत दिले होते.

पंजाबमध्ये आज १३२ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आम्ही २८७७ नमुन्यांची तपासणी केली आहे. पंजाबची लोकसंख्या अडीच कोटी पेक्षा जास्त आहे. त्यातुलनेत कोरोना चाचणीचे प्रमाण कमी होत आहे असे अमरिंदर सिंग म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती करोनाच्या संसर्गामुळे गंभीर होत चालली आहे. येत्या १४ एप्रिलपर्यन्त लागू असलेल्या लॉकडाउन संपायला ४ दिवस शिल्लक असताना महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा संख्या १ हजार ३८० पर्यंत पोहोचली आहे. तर आतापर्यंत ९८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अशा बिकट परिस्थितीत लॉकडाऊन वाढवावा अशी शिफारस प्रशासनातील बऱ्याच अधिकाऱ्यांनी केली आहे.

त्यामुळं राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लॉकडाउनला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून लॉकडाउनसंदर्भात वाढवण्यासंदर्भात अद्याप कोणतीही भाष्य करण्यात आलेलं नाही. मात्र, येत्या ११ तारखेला राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतरच लॉकडाउन वाढवण्याबाबत निर्णय होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारच्या विचाराधीन असतानाच आधी ओडिशा आणि आता पंजाब सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment