Wednesday, October 5, 2022

Buy now

पंजाब नॅशनल बँकेने लाँच केले PNB One App; ग्राहकांना होणार मोठा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी PNB One App लाँच केले आहे. यामुळे बँकेच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार असून या App च्या मदतीने ग्राहक बँकेशी संबंधित कोणतीही कामे घरबसल्या करू शकतील. पंजाब नॅशनल बँकेने एका ट्वीट द्वारे आपल्या ग्राहकांना हे App डाउनलोड करण्याचा सल्ला दिला आहे.

या App द्वारे ग्राहकांना 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करता येणार आहे. याची डिफॉल्‍ट लिमिट 2 लाख रुपये आहे जी वाढवून 10 लाख रुपये केली जाऊ शकते. PNB One App द्वारे ग्राहक PPF अकाउंट मध्ये पैसे जमा करू शकतात. तसेच तुम्ही सुकन्या समृद्धी आणि डीमॅट खाते देखील लिंक करू शकता. याशिवाय, तुम्ही FD आणि फॉर्म 26AS सारख्या सुविधा देखील वापरू शकता…

अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन
सर्वांत आधी प्ले स्टोअरवरून PNB One App डाउनलोड करा.
या App वरील New User वर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा बँक खाते क्रमांक टाका.
रजिस्ट्रेशनसाठी मोबाइल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग निवडा.
आता प्रोफाइल निवडा – व्ह्यू ओनली किंवा व्ह्यू अँड ट्रान्सझॅक्शन सिलेक्ट करा.
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. तो एंटर करा आणि Continue वर क्लिक करा.
OTP टाकल्यानंतर डेबिट कार्डचे डिटेल्स टाका.
यशस्वी व्हॅलिडेशननंतर, लॉगिन आणि ट्रान्सझॅक्शन पासवर्ड सेट करा.
पासवर्ड सेट केल्यानंतर रजिस्ट्रेशन केले जाईल. आता तुम्ही साइन इन वर क्लिक करून App वापरू शकता.