हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्वात जास्त वाहनांची खरेदी करण्यात येते. यावर्षी पुणेकरांनी देखील दणक्यात वाहनांची खरेदी केल्याचे चित्र दिसत आहे. कारण, नवरात्रोत्सवात पुणेकरांनी 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान 10,872 वाहनांची खरेदी केली आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेने यावर्षी वाहनांच्या विक्रीत जास्त वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पुण्यात 9,051 वाहनांची खरेदी करण्यात आली होती. मात्र यावर्षी पुणेकरांनी 10,872 वाहनांची खरेदी केली आहे..
आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, नवरात्री ते दसऱ्याच्या काळामध्ये पुणेकरांनी 10,872 वाहनांची खरेदी केली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केल्याची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये बाईक मोटार सायकल आणि कार अशा गाड्यांची सर्वात जास्त खरेदी करण्यात आली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांनी मोटार सायकल (Motor cycle) – 6,419, कार (Car) – 3,531 रिक्षा – 241, गुडस – 335, टॅक्सी – 309, बस – 37 अशा सर्व वाहनांची खरेदी केली आहे.
त्याचबरोबर ऑक्टोंबर महिन्यात 900 होऊन अधिक ई- वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक ई वाहनांवर जास्त भर देताना दिसत आहेत. ई वाहने ग्राहकांना परवडत असल्यामुळे यावर्षी पुण्यात 900 वाहनांची विक्री झाली आहे. असे सर्व वाहने मिळून पुण्यात दसऱ्याच्या निमित्ताने 10,872 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.. दरम्यान, एकीकडे पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला असताना दुसरीकडे पुणेकर नव्या गाड्या खरेदी करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत.