कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
भाजपाचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी आज मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. पुरुषोत्तम यांच्या घरवापसीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांत जल्लोषाचे वातावरण असून सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेने २०१४ साली सातारची जागा आरपीआय पक्षाला दिल्याने पुरुषोत्तम जाधव यांनी सेनेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे उदयनराजे यांच्या विरोधात पुरूषोत्तम जाधव हे समीकरण निश्चित मानले जात होते. मात्र ते कोणत्या पक्षातून की अपक्ष हे निश्चित होत नव्हते. आज शिवबंधन बांधून त्यांनी अखेर शिवधनुष्य हाती घेतले आहे.
‘पाच वर्षांनंतर मला शिवसेनेत येण्याची संधी दिली आहे. आता सातारा मतदारसंघात भगवा फडकला जाईल’ असे म्हणत जाधव यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, पशुसंवर्धन मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना सचिव खा. अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, उपनेते व संपर्क प्रमुख नितीन बानुगडे- पाटील आदि नेते उपस्थित होते. पुरूषोत्तम जाधव याच्या शिवसेना प्रवेशामुळे सातारा लोकसभेची राजकिय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात
साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद
नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?