महाराष्ट्र हादरला ! नराधमाने चिमुकलीला वेठीस धरत आईबरोबर केले ‘हे’ कृत्य

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमधील सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या प्रकरणात नराधम आरोपीने लहान मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला ठार मारण्याची धमकी देत तिच्या आईवर बलात्कार केला आहे. या आरोपीने अनेकवेळा पीडित महिलेचे लैंगिक शोषण केलं आहे. अखेर आरोपीच्या अमानुष कृत्याला कंटाळून पीडित महिलेनं सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून नराधम आरोपीला अटक केली आहे.

आजाद शेख असे नराधम आरोपीचे नाव आहे. या आरोपीने पीडित महिलेला त्र्यंबकेश्वर येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर रात्रभर बलात्कार केला. यानंतर पीडित महिलेनं नराधमाच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पीडितेच्या छोट्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर या नराधमाने पीडित महिलेला विविध ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले.

या आरोपीने 17 डिसेंबर रोजी पीडित महिलेवर रात्रभर बलात्कार केल्यानंतर पीडितेला मित्राच्या घरी घेऊन नेले. याठिकाणी देखील आरोपीनं पीडितेवर जबरदस्ती करत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर अत्याचाराची वासना मिटल्यानंतर आरोपीनं पीडित महिलेला नाशिकमध्ये सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पीडित महिलेनं नाशिक रोड पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र हलवत नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.