औरंगाबाद | दिवसेंदिवस घरफोडीचे सत्र सुरूच आहे. पार्लरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत म्हणून घरातील दागिने आणि रोकड हा ऐवज तिथे ठेवला मात्र चोरट्यांनी ब्युटीपार्लरचे कुलूप तोडून 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन तोळे दागिने लंपास केले. एका रात्रीत चोरट्याने तीन घरे आणि एक मेडिकल फोडले. ही घटना एन-4 सिडको भागात 25 ऑगस्टच्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.
हाती आलेल्या माहितीनुसार, संध्या दौलत जाधव (42) या पारिजात नगर एन-4 सिडको येथे राहतात. त्यांनी यांच्या सिडकोतील सेक्टरमध्ये सुदीप सिंह सहदेव चौरे यांच्या घरात कांचन ब्युटी पार्लर व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवतात. येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. सीसीटीव्हीच्या विश्वासावर असलेल्या घरात त्यांनी दागिने व पैसे ठेवले होते.
24 ऑगस्टला सकाळी सात वाजता जाधव कुटुंबिय रक्षाबंधन निमित्त मंगरुळ (ता चांदवड जि. नाशिक) येथे गेले होते. त्यामुळे ब्युटीपार्लर बंद होते. त्याच रात्री चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून ब्युटीपार्लर फोडले घरात घुसून 1 लाख 10 हजार रुपये रोकड व दागिने ठेवले होते. 25 ऑगस्टला सकाळी घरमालक चौरे यांचा फोन आल्यावर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. ही माहिती पुंडलिक नगर पोलिसांना देण्यात आली. उपनिरीक्षक विकास खटके यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.