नाकात साप घालून तोंडातून काढला बाहेर ; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | साप लांबून पाहिला तरी सर्वांच्याच अंगावर काटा येतो. माणसाला सापांची असलेली भीती ही सर्वश्रुत आहे. पण जर कोणी व्यक्ती सापाला स्वतःच्याच नाकात घालून तोंडातून बाहेर काढत असेल तर कसं वाटेल? बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल याने नुकताच असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की ही व्यक्ती साप नाकात घालून त्याला तोंडातून बाहेर काढत आहे. यादरम्यान सापाचा काही भाग हलताना पाहू शकता. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहिलं. विद्युतने व्हिडीओ शेअर करीत आय लव्ह माय इंडिया असं कॅप्शन दिलं आहे.

https://www.instagram.com/p/CQ0WLsIDqQi/?utm_medium=copy_link

दरम्यान सोशल मीडियावर हा भयानक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून या व्हिडिओ अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही लोकांना मात्र हा व्हिडीओ आवडला नसून नाराजगी देखील व्यक्त केली आहे

Leave a Comment