सर्वसामान्य भाजी विक्रेत्यांच्या प्रश्नी माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे आयुक्तांच्या भेटीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी – चिंचवड महापालिका क्षेत्रातील सांगवी या भागात अनेक भाजी विक्रेते भाजीपाला विक्री व्यवसायातून आपली उपजीविका चालवत आहेत. भाजीपाला विक्री हाच एक त्यांचा उत्पन्नाचा मार्ग आहे.पण महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मात्र त्यांना रोजच त्रास दिला जातो आहे.या प्रश्नावर पिंपरी – चिंचवड महापलिकेचे माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि महापौर माई ढोरे यांची भेट घेत तत्काळ ही कारवाई थांबवावी असे निवेदन दिले.

या प्रसंगी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना अतुल शितोळे म्हणाले की ” कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले होते.ते आता कुठे पूर्वपदावर येतंय. सर्वसामान्य भाजीपाला विक्रेता भाजी विक्री करून आपला चरितार्थ चालवतोय तर महापालिका प्रशासन त्याला विरोध करत त्यांचे वजनाचे मापं,हातगाड्या जप्त करत आहे.त्याचा भुर्दंड या लोकांना सोसावा लागतो.त्यामुळे आयुक्तांनी आणि महापौरांनी यात लक्ष घालून ही कारवाई रोकावी असे आम्ही आज निवेदन दिले. तसेच महापालिकेने लवकरच होकर्स झोन निर्माण करावे अशी मागणी देखील केली असल्याचे शितोळे यांनी सांगितले आहे.

यावेळी राकेश भोसले,पंकज जोशी,विवेक ढेबे,अक्षय डागळे, नीरज झुंजारराव आदी कार्यकर्ते तर भाऊ सौदागर,गोविंद सगट,सतीश माने,आशाताई लोहकरे, हेमाताई जयालिंग आदी भाजी विक्रेते उपस्थित होते.

Leave a Comment