पेट्रोल पंपांवर लागल्या रांगा, विविध पेट्रोलपंपांवर नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अंशतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच रात्री ८ वाजेपर्यंतच पेट्रोल पंप सुरू असल्याने आज दिवसभर शहरातील विविध पेट्रोलपंपांवर नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली.

एकीकडे जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच आता लॉकडाऊनची चिंता देखील अनेकांना लागून आहे. त्यातच सध्या शहरात कोरोनाचा आकडा पाहता अंशतः लॉकडाऊन आणि शनिवार, रविवारी पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले आहेत. त्यातच रात्री ८ पर्यतच पेट्रोल पंप सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्याने उद्या, परवा विकेंड लॉकडाऊन आहे.

सोमवारी धुलिवंदन सण आल्याने पेट्रोल मिळणार की नाही, या भीतीने अनेकांनी पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे दिसून आली. याशिवाय शहरातील काही पेट्रोल पंप सील केल्याने अनेकांना पेट्रोल भरण्यासाठी इतरत्र पेट्रोलपंपावर जावे लागत असल्याने शहरातील सुरू असलेल्या काही पेट्रोलपंपांवर गर्दी दिसून आली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment