डी कॉकची चलाखी अन फखर झमनचे दुसरे द्विशतक हुकले (video)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 17 धावांनी विजय मिळवला. दरम्यान 342 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा आक्रमक सलामीवीर फखर झमनने 193 धावांची वादळी खेळी केली. अंतिम षटकात फखर धावबाद झाला नसता तर त्याने कारकिर्दीतील दुसरे एकदिवसीय द्विशतक ठोकले असते. पण विकेट किपर क्विंटन डी कॉकच्या चतुराईने फखर झमनला माघारी परतावे लागले.

झाले असे की लुंगी एन्गिडीने टाकलेल्या चेंडूवर फखरने फटका मारला. त्यानंतर तो आणि त्याच्याबरोबर फलंदाजीला असलेल्या हॅरीस रॉफने धावा मिळवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी पहिली धाव यशस्वी पार केली. मात्र दुसरी धाव घेत असताना दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक एडेन मार्करमने यष्टीरक्षक उभ्या असलेल्या एन्डकडे चेंडू फेकला आणि तो चेंडू थेट स्टंपला लागला. त्यावेळी फखर क्रिजमध्ये परतलेला नव्हता, त्यामुळे त्याला बाद होऊन परतावे लागले.

यावेळी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटॉन डीकॉकची चालाखी कामी आली. कारण त्याने अशी कृती केली की फलंदाजाला असे वाटेल की क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या एन्डला चेंडू फेकणार आहे. ज्यामुळे फखरने मागे वळून पाहिले आणि त्याला क्रिजमध्ये येण्यास काही सेंकद उशीर झाला आणि तो धावबाद झाला. तसेच द्विशतकाची संधीही हुकली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group