हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा दिग्गज ऑफ -स्पिनर रवीचंद्रन अश्विनने (R. Ashwin) आपली ऑल टाइम बेस्ट IPL XI संघाची निवड केली आहे. आर अश्विनने आपल्या संघात दिग्गज खेळाडूंना स्थान दिले आहे. यामध्ये ६ फलंदाज, २ अष्टपैलू फिरकीपटू आणि ३ जलदगती गोलंदाजांचा समावेश आहे. भारताचा सर्वोत्तम कर्णधार महेंद्रसिंघ धोनीच्या (MS Dhoni) गळ्यात अश्विनने कर्णधारपदाची माळ घातली आहे. अश्विन स्वतः धोनीच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष क्रिकेट खेळला आहे.
अश्विनच्या संघात कोणाकोणाला स्थान –
आर अश्विनने आपल्या टाइम टाइम बेस्ट IPL XI मध्ये सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहली या २ महान फलंदाजांना निवडलं आहे. विराट आणि रोहित हे २००८ पासून म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहेत. दोन्ही खेळाडूंनी आयपीएल मध्ये खोऱ्याने धावा काढल्यात. तिसऱ्या क्रमांकावर अश्विनने मिस्टर आयपीएल नावाने प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाची निवड केली आहे. सुरेश रैना हा आयपीएल इतिहासातील सार्वकालीन महान खेळाडू म्हणून गणला जातो. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अश्विनने सूर्यकुमार यादव आणि एबी डिव्हिलिअर्स या दोन्ही ३६० डिग्री फलंदाजांना पसंती दर्शवली आहे. कोणत्या परिस्थितीत सामना खेचून आणण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे.
अश्विनने अष्टपैलू खेळाडू म्हणून रशीद खान आणि सुनील नारायण या २ फिरकीपटू खेळाडूंना संधी दिली आहे. दोन्ही खेळाडू आपल्या टिच्चून गोलंदाजीसाठी ओळखले जातात तसेच ऐनवेळी जोरदार फटकेबाजी करण्याची क्षमता सुद्धा रशीद खान आणि सुनील नारायणमध्ये हे संपूर्ण जगाने बघीतले आहे. यानंतर अश्विनने आपल्या संघात ३ जलदगती गोलंदाजाची निवड केली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश आहे. यातील भुवनेश्वर कुमार हा सुरुवातीला चेंडू स्विंग करण्यात माहीर आहे तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा हे दोन्ही यॉर्कर किंग डेथ ओव्हर मधेय संघासाठी फायदेशीर ठरतील.
अशी आहे अश्विनची ऑल टाइम बेस्ट IPL XI-
रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, एबी डीव्हिलियर्स, महेंद्रसिंग धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), रशीद खान, सुनील नारायण , भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा