Rabies Virus | रेबीज एक असा विषाणूजन्य आजार आहे. जो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. आजपर्यंत आपल्याला रेबीज हा आजार कुत्र्याच्या चावण्याने होतो, हे माहीत आहे. परंतु इतर असे अनेक प्राणी आहेत. ज्यांच्या चावण्याने देखील आपल्याला रेबीज होऊ शकतो. आता हे नक्की प्राणी कोणते आहेत? आणि रेबीज पासून वाचण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल? याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
रेबीज पसरवणारे प्राणी | Rabies Virus
कुत्रा
आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, कुत्रा चावल्याने रेबीज होण्याची शक्यता असते. रेबीजचे सर्वात जास्त वाहक कुत्र्यामार्फत होत असते.
मांजरी | Rabies Virus
अनेक लोकांना घरात मांजरी पाळायला खूप आवडत असतात. परंतु याच आवडणाऱ्या मांजरीमुळे रेबीज पसरू शकतो. ही मांजर जंगली मांजरीच्या संपर्कात आली, तर त्यांना रेबीज होऊ शकतो. आणि तोच रेबीज माणसांना देखील होऊ शकतो.
कोल्हे
कोल्ह्यानमार्फत देखील रेबीज पसरण्याची दाट शक्यता असते. रेबीज पसरवण्यात कोल्ह्याचा महत्त्वाचा वाटा असतो.
वटवाघुळ
वटवाघुळ हा देखील एक रेबीज विषाणू पसरवणारा सगळ्यात धोकादायक प्राणी आहे. वटवाघुळमार्फत देखील रेबीज मोठ्या प्रमाणात पसरतो.
माकडे
माकडा मार्फत देखील मोठ्या प्रमाणात रेबीज हा विषाणू पसरतो. तुम्ही जर जंगली माकडांच्या सर्व वर्गात आला, तर हा रेबीज होण्याची शक्यता तुम्हाला जास्त असते.
रेबीजची लक्षणे
तुम्हाला जर वरील कोणताही प्राणी चावला, तर काही आठवड्यात किंवा काही महिन्यांमध्ये रेबीजची लक्षणे दिसू लागतात. यामध्ये सुरुवातीला आपल्याला ताप येतो, डोकेदुखी होते, थकवा येतो, स्नायू दुखतात, अस्वस्थपणा आणि जळजळ होते. परंतु ही लक्षणे जास्त असेल, तर कधी कधी अर्धांगवायू कोमा यांसारख्या आजारांना देखील सामोरे जावे लागते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रेबीज हा एक गंभीर आजार आहे. कधी कधी या रेबीजमुळे माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो. जर एखाद्या प्राण्याने तुमचा चावा घेतला, तर लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. रेबीज टाळण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. यासाठी तुम्ही प्राण्यांपासून दूर राहा. तसेच तुमच्या पाळीव प्राण्यांचे लसीकरण करा. तुम्हाला जर प्राणी चावला तर वैद्यकीय मदत घ्या.