Thursday, March 23, 2023

पुराचा धोका वाढला; राधानगरी धरण 96.17 टक्के भरले, चार दरवाजे उघडले

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसामुळे महापुराची संकट ओढवलेलं आहे. यातील सातारा जिल्ह्यातील वाई, पाटणला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर सांगली, कोल्हापुरात तर अजूनही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आज दुपारी राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार उघडले आहेत. धरणातून 6 हजार 912 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

कोल्हापुरात आतापर्यंत झालेल्या पावसापैकी विक्रमी पाऊस शुक्रवारी झाला. यात शुक्रवारी रात्री विक्रमी 56.3 फुटांवर असलेली राजाराम बंधार्‍याची पाणी पातळी शनिवारी रात्री 10 वाजता 53 फुटांवर आली. तर रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास 51 फुटांवर आली. त्यामुळे चिखली गावाला पुराचा वेढा असून, ‘एनडीआरएफ’च्या पथकांकडूनक येथील नागरिकांचे स्थलांतरित केले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान,  कोल्हापूर जिल्ह्यातील 366 गावे अजूनही पूरबाधित आहेत. सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 48 तासांत जिल्ह्यात सर्वाधिक 700 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 98 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील दोन महामार्गांसह 73 मार्ग वाहतुकीसाठी बंद असून, 17 राज्य मार्ग व 55 जिल्हा मार्ग बंद आहेत. राधानगरी धरण 96.17 टक्के टक्के भरले आहे.