शेतकरी आत्महत्येला शरद पवारच जबाबदार – रघुनाथदादा पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । शरद पवार जसे चांगल्या कामाचे श्रेय घेतात तसेच अपयशाची जबाबदारी घेणेही गरजेचे असल्याचं मत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलं आहे. चांगल्या कामाचे श्रेय आम्ही त्यांना देवू मात्र शेतकरी आत्महत्यांचीही जबाबदारी त्यांनी स्विकारावी असं पाटील म्हणाले आहेत. पुढे बोलताना पंडित जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी शेतकरी विरोधी धोरणे राबविल्याची टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले कि, शेतकरी कर्जबाजारी होण्याचं मुख्य कारण हे शेतमालाला न मिळणार भाव आहे. अमी कारण म्हणजे याबाबतच सरकारी धोरण. जोपर्यंत सरकार शेतमालाच्या भावाबाबत धोरण बदलत नाही शेतकरी विरोधी कायद्यात बदल करणार नाही तोपर्यंत शेतकरी कर्जबाजारी राहणार आहे. राज्यात नवीन सरकार आलं असलं तरी केवळ चेहरे बदलले आहेत सरकार तेच आहे. तरी सुद्धा यासरकाराला शेतकरी धोरणात बदल करण्यासाठी भाग पडण्याची भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली आहे. रघुनाथ पाटील यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

Leave a Comment