Rahul Deshpande : राहुल देशपांडेंचा ‘अमलताश’ प्रेक्षकांना देणार म्युझिकल ट्रीट; भावस्पर्शी ठरली पहिली झलक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rahul Deshpande) मराठी सिनेविश्वातील दिग्गज मंडळी कायम दर्जेदार कलाकृतींचे सादरीकरण करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. असाच एक जीवनाच्या सुराचे भावस्पर्शी सादरीकरण करणाऱ्या कलाकृतीची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘अमलताश’ या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. सुहास देसले लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे निर्मित या चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे.

हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक म्युझिकल ट्रीट आहे. चित्रपटाची कथा ही संगीतातूनच पुढे जाताना दिसतेय. बहीण आणि भाचीसोबत राहणाऱ्या राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांच्या आयुष्यात एक परदेशी मुलगी आल्याचे दिसतेय, जिला संगीताची आवड आहे. संगीतप्रेमी राहुल यांच्या आयुष्याचे ‘त्या’ कॅनेडिअन मुलीशी सूर जुळणार का आणि हे संगीत त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ८ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. राहुल देशपांडे या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सुहास देसले म्हणाले की, ‘चित्रपटाचे वेबसीरिजमध्ये रूपांतर होते. मात्र इथे उलट झाले आहे. व्हिडीओ ब्लॉग म्हणून सुरु झालेला हा आमचा प्रवास पडद्यावर चित्रपटरूपात झळकणार आहे. राहुलनेच हे सर्व सुरू केले आणि त्यामुळे आपोआपच ते संगीतमय चित्रपटरूपात प्रकट झाले. (Rahul Deshpande) आम्ही निवडलेले सगळे कलाकार हे मुळात संगीतकार आहेत आणि चित्रपटात वापरलेली सर्व गाणीही सेटवर थेट रेकॉर्ड केली आहेत. आपण आपल्या प्रामाणिक भावना संगीतातून व्यक्त करू शकतो, त्यामुळे शक्य होईल तितके संगीत व्यक्त करणे, हा चित्रपटामागचा विचार होता’.

(Rahul Deshpande)’आमच्याकडे चित्रपटाची कथा नव्हतीच. आम्ही संगीत आणि पात्रांच्या जीवनावर यात भाष्य केले आहे आणि हाच चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचा वाटेल कारण यातील पात्र तुम्हाला आपल्यातीलच भासतील. एखाद्या प्रियजनासारखी ही पात्रे तुमच्याशी बोलतील. आमचे चित्रीकरण हे पुण्यात झाले आहे. खूप तरल विचार करून पुणे न्याहाळले तर पुणे शहर हे एखाद्या कवितेसारखेच भासेल. अमलताश, बहावा, वर्षातून एकदाच फुलतो, आपले जीवन समृद्ध करतो आणि आनंदी निरोप देतो, आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रत्येकासाठी असेल’.