राहुल द्रविडची टीम इंडियाचा हेड कोच म्हणून नियुक्ती

मुंबई । टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात बरेच बदल होणार आहेत. कर्णधार कोहली टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असून संघाला एक नवा प्रशिक्षकही मिळणार आहे. बीसीसीआयने बऱ्याच काळापासून मुख्य प्रशिक्षकासह, बोलिंग कोच आणि फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. यावेळी रवी शास्त्रीनंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड यांच्या नावाची जोरदार चर्चा होती.

यानंतर अखेर आता द्रविडची टीम इंडियाचा हेड कोच म्हणून नियुक्ती झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. द्रविडने काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं. त्यावेळी भारताने विजयही मिळवला होता. तेव्हापासून द्रविडला मुख्य संघाचा हे़ड कोच करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती.

पुढच्या दोन वर्षांसाठी राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच असेल. या दोन वर्षांमध्ये टीम इंडिया आणखी एक टी-20 वर्ल्ड कप आणि वनडे वर्ल्ड कप खेळणार आहे. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेचच 17 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड सीरिजला सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये 3 टी-20 आणि दोन टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.

You might also like