हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत ३ टप्प्यात मतदान पार पडलं असून अजून मतदानाचे ४ टप्पे बाकी आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस पक्षाची (Congress) एक चूक मान्य केली आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाला आपले राजकारण बदलावे लागेल तसेच काही धोरणात बदल करावे लागतील असं राहुल गांधी यांनी म्हंटल. इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे आयोजित ‘राष्ट्रीय संविधान परिषदे’ला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते.
आपल्या भाषणात राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या आहेत, असे मला म्हणायचे आहे, मी काँग्रेसचा असूनही हे सांगत आहे. आपल्याला काही चुका सुधारण्याची गरज आहे. मात्र, यावेळी राहुल गांधी यांनी थेटपणे कोणत्या चुकीचा उल्लेख केला नाही. भारत जोडो यात्रेच्या दरम्यान मला समजलं कि मी जनेतचा आवाज आहे. त्यांच्या दुःखाचा सुखाचा आवाज आहे. मला इतर कशातही रस नाही असे राहुल गांधी यांनी म्हंटल.
पुढे राहुल गांधी यांनी आरक्षण, जातिव्यवस्था तसेच संविधानावरील कथित हल्ल्यांबाबतही भाष्य केलं. भारतातील कोट्यवधी लोक असे जीवन जगले आहेत जिथे त्यांनी त्यांचे भविष्य ठरवले नाही, परंतु समाजाने त्यांच्यासाठी ते केले आहे. अनेकांनी हे वास्तव स्वीकारले आणि ते बदलण्यासाठी उभे राहिले. आयुष्यभर राजकारणात सत्तेच्या मागे धावणाऱ्यांना हे वास्तव मान्य नाही, ते स्वतःचे किंवा इतरांचे वास्तव कधीच स्वीकारत नाहीत असे राहुल गांधी यांनी म्हंटल.