Rahul Gandhi Arrested : राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात!! दिल्लीत मोठ्या घडामोडी

Rahul Gandhi Arrested
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rahul Gandhi Arrested । बनावट मतदार यादीच्या मुद्द्यावरून विरोधी बाकावरील इंडिया आघाडीने आज दिल्लीत मोर्चाचे काढला. संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाला विरोधी पक्षातील ३०० पेक्षा जास्त खासदार उपस्थिती होते. या सर्व खासदारांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर अगदी दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी, संजय राऊत, अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीच्या बड्या नेत्यांना ताब्यात घेतलं.

खरं तर दिल्ली पोलिसांनी या मोर्चाचे परवानगी दिली नव्हती. मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरेकेड लावली होती. मात्र विरोधी पक्ष काहीही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली हा भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला. “सेव्ह व्होट” नावाचे बॅनर हातात धरून खासदारांनी निषेध व्यक्त केला. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी थेट बॅरिकेडवरुन उडी मारून दुसऱ्या बाजुला पोहोचले. पोलिसांनी त्यांना आणि इतर खासदारांना पुढे जाण्यापासून रोखले, त्यानंतर ते रस्त्यावरच धरणे आंदोलनावर बसले. सर्वच खासदारांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना ताब्यात घेतले.

ही लढाई संविधान वाचवण्यासाठी – Rahul Gandhi Arrested-

मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधींचा आक्रमकपणा थांबला नाही. पोलीस गाडीच्या खिडकीमधून त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. सत्य हे आहे की ते काही बोलू शत नाहीत. सत्य संपूर्ण देशासमोर आहे. हा राजकीय संघर्ष नाही. ही लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे. हा संघर्ष एक व्यक्ती एक मत या धोरणासाठी आहे. आम्हाला पारदर्शक आणि संपूर्ण मतदारयादी हवी आहे,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी राहूल गांधींना पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यांना गंभीर उत्तरे मिळाली पाहिजेत. , निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही याची खात्री करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे असं शशी थरूर यांनी म्हंटल.