दिल्ली । कर्जमाफी आणि हमीभावाच्या मागणीला घेऊन देशभरातील हजारो शेतकर्यांनी दिल्ली येथे किसान मुक्ती मोर्चा काढला आहे. देशाच्या कानाकोपर्यातून हजोरो शेतकरी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जमले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरिवाल यांनी शेतकर्यांना आपाल पाठिंबा दर्शवला आहे.
संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव द्यावा, देशभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे केल्या आहेत. अडवणूक झाली तरी मोर्चा निघणारच असा निर्धार मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. सुरक्षेसाठी उपाय म्हणून संसद परिसरातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली असून संसदेकडे जाणार्या रस्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
किसान मुक्ती मोर्चात ३ ते ४ लाख शेतकरी तसेच २०० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या असल्याचे समजत आहे.