कोरोना लसीबद्दल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ‘हे’ चार प्रश्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोना विषाणूचा कहर झाला असून कोरोना वरील लस कधी येणार यांकडे जनतेचे लक्ष लागले आहे. त्यातच आता काँग्रेस करते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीबाबत देशाला उत्तर दिली पाहिजेत, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी ट्विटद्वारे नरेंद्र मोदी यांना चार प्रश्न विचारले आहेत.  कोरोनावरील लस बनवणाऱ्या कोणत्या कंपनीची निवड केली गेलीय, पहिल्यांदा लस कोणाला मिळणार, कधी मिळणार, मोफत लस मिळणार, असे प्रश्न राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना विचारले आहेत.

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना भारत सरकरानं कोरोना लस बनवणाऱ्या सर्व कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीची निवड केली आहे आणि का केली आहे? हा प्रश्न विचारला आहे.

कोरोना लस पहिल्यांदा कोणाला उपलब्ध होणार आणि कोरोना लस मिळाल्यानंतर त्याच्या वितरणाबाबत काय धोरण ठरवण्यात आले आहे? हा प्रश्नही राहुल गांधीनी विचारला आहे.

कोरोना काळात तयार केलेल्या पीएम केअरचा निधी सर्व भारतीयांना मोफत कोरोना लस देण्यासाठी वापर केला जाणार का? हा प्रश्न देखील राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. सर्व भारतीयांना कोरोना लस कधीपर्यंत दिली जाणार आहे? हा प्रश्नदेखील राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.

दरम्यान,  पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (SII) विकसित करण्यात येत असलेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 90 टक्के प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. तशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment