Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी कॉंग्रेसने नेत्यांना दिली ‘हि’ मोठी ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु केली आहे. या यात्रेला संपूर्ण देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान, सर्व नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून मोठी ऑफर देण्यात आली आहे. कॉंग्रेसने काढलेल्या नव्या फतव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. राहुल गांधी नुकतेचं हरियाणात पोहचले आहेत. यानिमित्त (Bharat Jodo Yatra) राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग दोतसरा यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी हि घोषणा करण्यात आली.

तर आमदारकी अन् मंत्रीपद मिळेल
काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्याला महिन्यातून एकदा 15 किलोमीटर चालणं अनिवार्य असणार आहेत. तसेच 26 किंवा 27 जानेवारीपासून महिन्यातून एक दिवस पदयात्रेत (Bharat Jodo Yatra) चालण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.जर कुणाला काँग्रेसमध्ये काम करायचं असेल, पद हवं असेल, आमदार,मंत्री राहायचं असेल तर त्यांना पदयात्रेत 15 किलोमीटर चालावं लागेल. महिन्यातील एक दिवस त्यांना गावातील लोकांबरोबर पदयात्रेत चालावं लागेल हे आम्ही सुनिश्चित करणार आहोत असेही राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग दोतसरा म्हणाले आहेत.

भारत जोडो यात्रा थांबविण्याची मागणी
सध्या जगभरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) थांबविण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात एक पत्र राहुल गांधी यांना पाठविले आहे. या पत्रात कोरोनाचे कारण दिले असले तरी राजकीय वर्तुळात मात्र वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या