हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी सीलमपूर मतदारसंघात पहिली सभा घेतली. यावेळी, त्यांनी भाजपपेक्षा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, मोदी आणि केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीमध्ये काही फरक नसल्याचा आरोप करत, दोघेही अदानी प्रकरणावर मौन बाळगतात, असे राहुल गांधी यांनी म्हणले.
त्याचबरोबर, शीला दीक्षित यांच्या कार्यकाळाची आठवण करून देत राहुल गांधी म्हणाले की, “दिल्लीतील स्वच्छता, विकास आणि भ्रष्टाचारमुक्त दिल्लीचे आश्वासन देत केजरीवाल सत्तेत आले. पण आज प्रदूषण वाढले आहे, जीवनशैली बिघडली आहे आणि भ्रष्टाचार संपण्याऐवजी वाढल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदीप्रमाणेच केजरीवाल देखील खोटी आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करत आहेत.”
केजरीवाले यांचे प्रत्युत्तर
दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देत अरविंद केजरीवाल यांनी म्हणले की, “राहुल गांधी काँग्रेसला वाचवण्यासाठी लढत आहेत, तर मी देश वाचवण्यासाठी लढतो आहे.” त्याचबरोबर, केजरीवाल यांनी भाजपवरही हल्लाबोल करत भाजप बनावट मतदार तयार करत असल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रकरणात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.