राहुल गांधी स्वतःच दहशतवादी; रामदास आठवलेंच्या विधानाने नवा वाद??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवण्याचं काम करतात असं म्हणत काँग्रेस नेते आणि संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. मात्र यावेळी राहुल गांधी यांनी देशभरातील हिंदूंचा अपमान केला असं म्हणत भाजपने हा मुद्दा उचलून धरला. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) आपल्या विधानावरून माफी मागावी अशी मागणीही भाजपकडून करण्यात येत आहे. या सर्व वादात आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उडी घेत थेट राहुल गांधींनाच दहशतवादी म्हंटल आहे. आठवले यांच्या या आरोपाने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

आठवले म्हणाले, राहुल गांधींनी हिंदूंना दहशतवादी म्हटलं, पण ते स्वतः दहशतवादी आहेत. राहुल हिंदू समाजाला तोडण्याचं काम करत आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करणं चुकीचं आहे असं म्हणत रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. आठवले यांनी राहुल गांधींना थेट दहशतवादी म्हणल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते आठवले यांच्या या विधानानंतर काय प्रत्युत्तर देते ते पाहायला हवं.

राहुल गांधी नेमकं काय म्हणले होते?

सोमवारी (1 जुलै) राहुल गांधी यांनी लोकसभेत आपलं म्हणणं मांडलं, तेव्हा चांगलाच गदारोळ झाला. जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवण्याचं काम करतात. तुम्ही लोक अजिबात हिंदू नाही. हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही, द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. मात्र राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: उभं राहून संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर बाब असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निदर्शनास आणून दिलं. पण तरीही राहुल गांधी मागे हटले नाहीत. भाजप म्हणजे हिंदू नाही असं म्हणत राहुल गांधी आपापल्या विधानावर ठाम राहिले.