हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा अनोखा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळालं. राहुल गांधींचा ताफा गुप्तरगंजमधील आमदार नगरमधील रामशेत मोची यांच्या दुकानात अचानक थांबला. लोकांना काय समजायच्या आधीच राहुल गांधीनी नी शूज आणि चप्पलही शिवल्या तसेच दुकानदार रामशेटशी संवादही साधला. धंदा करत असताना येणाऱ्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या. यावेळी आम्ही तुमचा आवाज बनू अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.
रायबरेलेची खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 26 जुलै रोजी मानहानीच्या खटल्यात सुलतानपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयीन कामकाज संपवून राहुल गांधी पुन्हा पूर्वांचल एक्सप्रेसवे मार्गे लखनौला रवाना झाले. मात्र पूर्वांचल द्रुतगती मार्गापूर्वी त्यांचा ताफा अयोध्या प्रयागराज महामार्गावरील कुरेभर पोलीस स्टेशन हद्दीतील आमदार नगर चौकाजवळ अचानक थांबला आणि राहुल गांधी गाडीतून उतरले आणि रामचेत नावाच्या मोच्याच्या दुकानाकडे निघाले. दुकानात उतरताच त्यांनी चप्पल कशी शिवतात हे दुकानदाराला विचारलं, आणि बघत बघत स्वताच चप्पल शिवली आणि बुटालाही टाके घातले. राहुल गांधींचा हा अनोखा अंदाज पाहून उपस्थित थक्क झाले.
थकिए न.. थमिए न.. चालता रहिए ❤️ pic.twitter.com/DIMuIq2NVT
— Congress (@INCIndia) July 26, 2024
यानंतर राहुल गांधी यांनी दुकानदाराला विचारले कुटुंब कसे चालते? तेव्हा दुकानातून कधी 100 रुपये तर कधी 50 रुपये मिळतात, असे रामशेट यांनी सांगितले. उत्तर ऐकून राहुल गांधीही विचारात पडले आणि एवढ्या कमी उत्पन्नात तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवतो? असा प्रश्न केला. यावर रामशेटने राहुल गांधींना सांगितलं कि घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे . मला काही आर्थिक मदत मिळाली तर मी नवीन व्यवसाय सुरू करू शकेन. या कामात स्वाभिमान नाही. लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहतात. त्यामुळेच मुलाला या कामापासून दूर ठेवण्यात आले आहे. यानंतर रामशेट यांचे सांत्वन करताना राहुल गांधी म्हणाले की, मी सर्वांचा आवाज उठवणार आहे.