‘मी गेल्या २ महिन्यापासून जे सांगतोय त्यावर आता खुद्द RBI नेच शिक्कामोर्तब केलाय- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या रिपोर्टचा हवाला देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गरीबांना पैसा द्या. उद्योजकांना कर कपात देऊ नका असं RBI ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं असून मागच्या अनेक महिन्यापासून मी जे बोलत होतो, त्यावर RBIने आता शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळं माडियाच्या माध्यमातून लक्ष विचलित करुन गरीबांचे भले होणार नाही ” असं म्हणतं राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. याशिवाय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राहुल गांधी यांनी काही पर्ययाही सुचवले.

“मागच्या अनेक महिन्यापासून मी, जे इशारे होतो त्यावर आता आरबीआयने शिक्कामोर्तब केलं आहे. सरकारने आता कर्ज देण्याची नव्हे तर खर्च करण्याची आवश्यकता आहे. गरीबांना पैसा द्या. उद्योजकांना कर कपात देऊ नका. खर्च वाढला तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. माडियाच्या माध्यमातून लक्ष विचलित करुन गरीबांचे भले होणार नाही किंवा आर्थिक आपत्तीही गायब होणार नाही” असे राहुल गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

RBIचा वार्षिक अहवाल काय म्हणतो?
करोना विषाणूजन्य साथीच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था बाहेर येईपर्यंत आणि तिला करोनापूर्व गती येईपर्यंत सरकारलाच खर्च वाढवून मागणीला चालना द्यावी लागेल, असे आग्रही मत रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या २०१९-२० सालच्या वार्षिक अहवालातून व्यक्त केले. मागणीविषयक वर्षभरात केले गेलेले मूल्यांकन हेच सूचित करते की, वस्तू व सेवा उपभोगाला विलक्षण मोठा धक्का बसला आहे आणि त्यात करोनापूर्व पातळीपर्यंत सुधारणेसाठी खूप वेळ लागेल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

खासगी क्षेत्रातून मागणीची वानवा असताना, सरकारने उपभोगवाढीचे उपाय योजून मागणीला बळ देणे भाग आहे. विशेष करून परिवहन सेवा, आतिथ्य आणि करमणूक उद्योग ठप्प आणि सांस्कृतिक क्रियाकलाप थंडावले आहेत आणि साथ प्रतिबंधात्मक उपाय सुरू राहिल्याने या क्षेत्रात इतक्या लवकर सामान्य स्थिती परतणे अवघड आहे, रिझव्‍‌र्ह बँकेने अहवालात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”