काँग्रेसचे काही नेते भाजपला मदत करतात ; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. पण, या बैठकीला आता वेगळंच रूप प्राप्त झाले आहे. आपल्यातीलच काही लोक भारतीय जनता पक्षाला मदत करत आहेत असा धक्कादायक आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यावरूनच आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी तर थेट राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.

राहुल गांधी यांनी या बैठकीमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपा विरुद्ध लढत असताना काही काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींना यांना पत्र का लिहिले. काही नेते हे भाजपला मदत करत असल्याचा आरोपच राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधी यांच्या या विधानामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली.त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भर बैठकीत पक्षाला इशारा दिला.

‘भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा सिद्ध झाला तर पदाचा राजीनामा देईल’ असं गुलाम नबी आझाद यांनी या बैठकीत सांगितलं. त्यांच्या विधानामुळे बैठकीत एकच खळबळ उडाली.

दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीवरुन काँग्रेसमध्ये दोन गट पाहण्यास मिळत आहे. सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्षपदावरून चांगलेच वादंग सुरू झाले आहे. सोनिया गांधी यांची जर इच्छा नसेल तर राहुल गांधी यांनी समोर यावं अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे काही काँग्रेसचे नेते हे सोनिया गांधींनीच अध्यक्ष राहावे, असं बोलून दाखवलं आहे.